पळसंबे – बोरबेट इतिहास पाऊलखुणा
कोल्हापुर ते गगनबावडा रोडवरील आसळाज गावापासुन तीन ते चार किलोमीटर डावीकडील बाजुस गेलेनंतर सह्याद्रीच्या कुशीत गर्द वनराईत लपलेल्या ओढ्याचा नाद आपल्याला आकर्षित करतॊ. रस्त्यावरुन खाली उतरुन गेल्यानंतर आपले डोळे दिपवणारी वनराई, स्वच्छ निर्मळ शांत वाहणार निरभ्र पाणी आणि समोर दिसतात ती हिनयान पंथीय छॊट्या पण टुमदार लेण्या पळसंबे येथील ओढ्याच्या पात्रात पहुडलेल्या आहेत. सध्याचे लेण्याचे ठिकाण हे प्राचीन तात्कालिन व्यापारी महामार्गाचा हा भाग असावा. या सर्व लेण्या जांभ्या दगडात कोरल्या आहेत. या लेण्या ऒढ्याच्या पात्राच्या वरील बाजुस असाव्यात परंतु कालाप्रमाणे पात्राशेजारील दग़डांचे सख्खलन होऊन ही लेणी पात्रात आली असावी. या लेण्यांमध्ये अर्धउठावातील स्तुप दिसुन येतात. या खडकांमधील तावदानांमध्ये अंड व वेदिका असणारे अर्धउठाव स्तुप सर्वत्र आढळतात. या प्रवाहाच्या वरीलबाजुस छॊटे चैत्यगृह व विहार आढळतो. या चैत्यगृहावरील छतावर इतर चैत्यगृहांची अर्धउठावातील प्रतिकृती (स्तुप व जाळीदार खिडक्या)आहेत. विहार व चैत्यगृहातील छत व ...