श्री क्षेत्र मलिक्कार्जुन तथा विलासगड
पुणे- बैंगलोर महामार्गावरील कराड पासुन 32 कि.मी अंतरावरील येडेनिपाणी गावापासुन आष्टा रोडवर थोडे पुढे गेल्यास अंदाजे दिड कि.मी अंतरावर श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येडेनिपाणी असा फ़लक आपण पाहतो. तेथुन समोरील डोंगरावरील फ़िक्या अबोली रंगाने रंगविलेले मंदिर दिसते.( सध्या रंगवले आहे) आपली गाडी या मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाते तेथुन मंदिरापर्यंत 30 मिनिटात पोहोचतो, हाच तो विलासगड मात्र स्थानिक लोकात येथील सध्या असणा-या मल्लिकार्जुन मंदिरावरुन हे ठिकाण मल्लिकार्जुन डोंगर या नावाने प्रसिद्ध आहे. येथे मंदिरापर्यंत जाण्याकरिता पाय-या केल्या आहेत. आपण काही पाय-या चढुन गेल्यानंतर नव्य...