पोहाळे लेणी


      कोल्हापुरला आलेल्या प्रत्येक पर्यट्काचा उद्देश हा ज्याप्रमाणे आई अंबाबाईचे दर्शन हा असतो. त्यानंतर त्याची आपसुक पावले श्री श्रेत्र जोतिबाकडे वळतात. जोतिबा म्हणजेच वाडी रत्नागिरीला आपण वडणगे, कुशिरे मार्गाने जोतिबाकडे जाताना जोतिबाच्या पायथ्याशी पोहाळे गावाच्या माथ्याशी पोहाळे लेणी कोल्हापुर पासुन 15 कि.मी. अंतरावर आहेत. रस्तालगतच खाली काही अंतर चालुन गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत पोहाळे लेण्याचे दर्शन होते.

 
       आपण पोहाळे लेण्याजवळ पोहचतो ही लेणी देखील गजपृष्ठकार असुन अलंकृत नाही यामुळे ती हिनयान पंथीय असावी याची ओळख पटते. आपल्या डावीकडे पाण्याची पोडी (कुंड) दिसतात.  डोंगरातुन वाहत येणारे पाणी साठवण्याची तसेच पाण्याचा निचरा होऊन वास्तु सुस्थितीत राहण्याची ही नेटकी व्यवस्था आहे. येथे वरील बाजुने प्रणाल (पन्हळ) असुन तिचे पाणी या पोडींमध्ये येते. लेण्यांमध्ये सुरुवातीस पोडी त्यानंतर आपल्याला तीन गुहा /लेण्या दिसतात. त्यानंतर आपण चैत्यगृहात येतो. गाभा-यात स्तुप आहे; त्यासमोर सध्या शंकराची पिंड व समोर नंदी आहे. तथापि मागील स्तुप त्यावरील हर्मिका तुटली आहे मात्र स्तुपाच्या वरील बाजुच्या तावरुन तेथे हर्मिका असावी असे वाटते. नेहमीप्रमाणे याही लेण्याचे ब्राम्हणी लेण्यात संस्करण करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.

 


      त्याच्या बाजुस विहार आहे हा प्रशस्त असुन 35*32*9 इतका आहे तो स्तंभावर पेलला आहे. आम्ही गेलो तेव्हा लेण्यांच्या पुनर्जिवनाचे पुरातन विभागाचे काम सुरु असल्याने आत प्रवेश बंद होता. यावरील एका स्तंभावर चंद्र, सुर्य, घोडा कोरणेत आला आहे. त्याच्या बाजुस चिंतन मननाची छॊटॊ अनेक दालने आहेत. सध्या लेण्याच्या डाव्या व उजव्या बाजुची बरीच पडझड झाली आहे. या लेण्यांसमोरही पाण्याचा योग्य निचरा करणेकरिताचे छॊटे पाट आहेत. लेण्यांतील खिडक्या- दरवाजांची रचना पाहता स्वच्छ, खेळती हवा राहणेच्यादृष्टिने केलेली व्यवस्था आढळते. तसेच पावसाच्या पाण्यापासुन संरक्षण होणेकरिता समोरील छत दरवाज्याच्यापुढे असुन व्हरांडा आहे, तर दोन्ही बाजुच्या भिंतीना खिडक्या (दालने) असुन बाजुचा भाग भिंतींनी पुर्ण  बंद आहे. या भागात पडणा-या पावसाच्या पध्दतीचा देखील लेणी खोदताना अभ्यास केला आहे. येथील खडक जांभा असल्यानेच लेण्यांची पडझड झाली आहे. सध्या लेण्यासमोर मध्यावर एक पिंपळाचे झाड आहे. येथे बाराही महिने पाणी उपलब्ध आहे. हे लेणे 7 व्या शतकातील असल्याचे कोल्हापुर जिल्हायाच्या गझेटियरमध्ये म्हटले आहे; परंतु नव्याने झालेल्या संशोधनानुसार हे लेणी मोर्यकालिन असुन ही लेणी धार्मिक प्रसाराचे केंद्र होते असे संशोधनातुन पुढे आले आहे. आपण अगदी कमी वेळात हे सुरेख लेण पाहु शकता तर जोतिबाला जाताना गाडी या थांब्यावर थोडया वेळाकरिता नक्की थांबवा.

     
    

Comments

Popular posts from this blog

चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार

पाणथळीतील पक्षांचे घर – रामलिंग बेट