वैविध्यपुर्ण पिंडींचे पाटेश्वर
थोड्याच वेळात आम्ही देगाव ला
पोहोचलो. तेथुन पाटेश्वरचा रस्ता गावात विचारुन पुढे निघालो.नुकत्याच पडुन गेलेल्या पावसाने सह्याद्रीची
कुशी हिरवीगार केली होती. बाजुचे तलाव बंधारे पाण्याने ओसंडुन वाहत होते. मोरांचे
आरव अशा प्रसन्न वातावरणात आमचे स्वागत करत होते.देगाव पासुन हे ठिकान तसही दुर नि
शांत होत. डोंगरावर जिथे रस्ता संपतो तेथे गाडी पार्क करुन आम्ही पाटेश्वर
मंदिराकडे कुच केली थोडे अंतर चालुन गेल्यानंतर पाय-या लागल्या. तिथेच समोर केशरी
रंगाने रंगवलेली श्रींची रिध्दी सिध्दी सह मुर्ती होती त्यांचे दर्शन घेऊन पुढे
जाऊ लागलॊ. वाटेत वेगवेगळी फ़ुलपाखरे विहार करत होती. हिरव्यागार गवतात सुंदर
चकाकी असणारी निळाईने नटलेली निलांबरीची फ़ुले आकर्षित करीत होती. आम्ही त्यांचे
फ़ोटॊ घेतले त्याबरोबर vegna नि सोनकीने परिसर नटला होता जसे एखाद्या कार्यक्रमात
नववधु साज करते तसा निसर्गाने साज चढवला होता.. मध्येच हिरव्या झाडीत लांब शेपुट व
लांब चोच असणारा पक्षी उडताना दिसला त्याला जवळुन पाहण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी
झाला. अशी निसर्गाची मनसोक्त उधळण पाहत दरमजल करत सुमारे एक ते दिड कि. मी. चालुन
आल्यावर एका सुंदर पाण्याच्या बांधीव तलावाशेजारी (पुष्करणी) आलॊ. तलावात सुंदर
कमळांची फ़ुले फ़ुलली होती. इतक्यात अमिता घोरपड घोरपड म्हणुन ओरडली पण दगड नि घोरपड
यांच्या एकाच रंगाने ती ओळखु येत नव्हती. या तलावासमोर एक मठ आहे. तसेच तलावामध्ये
दुर्मिळ अजएकपाद शिवमुर्ती आहे.
मठाच्या बाजुने थोडे वर चढुन गेल्यानंतर
आपण पाटेश्वर मंदीराच्या प्रांगणात पोहोचतो. मठाजवळुन जातानाच कोप-यात एकमुखी लिंगावर
57 अयोनिज लिंग असलेले व 65 सयोनिज (शाळूंखा असलेले) लिंगाचे शिवलिंग़ पाहुनच आपणास
आश्चर्याचा पहिला धक्का बसतो. पाय-या चढुन वर गेल्यानंतर मंदीराच्या बाहेरील बाजुस
मोठे शिवलींग आहे.बाजुला हनुमान विठ्ठल रुक्मीणी मंदीर आहे. तसेच गरूड, त्याच्या शेजारी
पिंड श्री यंत्र पाच शाळुंख्याची पिंड आहे. य्रथुन थोडे पुढे गेल्यास मरगळ लेणी आहे
हए शिवलिंग त्यावरील म्हैशीच्या शिल्पामुळे वैशिष्ट्यपुर्ण आहे. तेथुन माहे येऊन मंदिराच्या
आतील प्रांगणात आल्यानंतर पाटेश्वर मंदिर पंचायतन पदधतीचे मंदीर आहे. मुख्य मंदिर जिर्ण
झालेले असुन हे यादवकालीन बांधकाम वाटते. शिखर घुमटाची रचना अष्टकोनी आहे मुख्य मंदिरात
शिवलिंगाबरोबर शेषाशयी विष्णु, महिषासुरमर्दीनीची मुर्ती आहे. मंदीरा समोरचा नंदीची
रेखीव सुबक मुर्ती आहे. त्यासमोर शाळुंख्या असुन त्यासमोर शिव पार्वती लग्नाचे शिल्प
आहे. मंदिराच्या बाजुला चतुर्मुखी शंकर, भवानी, चंडिकेची मुर्ती आहे.
मुख्य मंदिरापासुन पुर्वेस काही अंतरावर दोन लेणी
समुह आहेत. सुरुवातीस आपणास लागतो पाच लेण्यांचा बळीभद्र लेणी समुह. यातील एका शिवपिंडीच्या
बाजुने चक्र, बदाम, गोल इ. दहा आकृत्या कोरल्या आहेत ते दिक्पाल शिवलींग.त्या आठ दिशा
व सुर्य- चंद्राचे प्रतिक मानतात. यातील एका लेण्यात अग्नी-वृषाची मुर्ती मानव व बैल
रुपातील मुर्ती असुन शेजारी सप्तमातृका आपल्या वाहनांसह आहेत मात्र त्या जिर्ण अवस्थेत
आहेत, त्याच्याबरोबरीने कार्तिकेय, चामुंडा, नवग्रह यांच्याही मुर्ती आहेत. येथे अजुन
चार लेणी आहेत त्यामध्ये सुबक शिवलींग असुन शाळुख्यांची उंची साधारण चार फ़ुट इतकी
आहे. यातील तीन लेण्यामध्ये पाणी असल्याने आम्ही एकाच लेण्यात आत जाऊ शकलो; याही शिवपिंडीच्या
रचनेत वैविध्य आढळते.लेण्यांमध्ये वैविध्यपुर्ण पिंडी असुन रचनेबाबत त्या वेगवेगळ्या
आहेत. अशी लोककथा सांगितली जाते कि येथे हजारो देव राहत होते.भक्त त्यांचेकरिता तांदुळ
आणावयास गेला परंतु तो आला नाही. म्हणुन इथल्या मुर्ती एका हातात मागणी करणा-या दिसतात.
तेथुन थोड्या अंतरावर व-हाड्घर हा तीन लेण्यांचा
समुह आहे. हा लेणी समुह तटांनी बदिस्त असुन प्रवेशव्दारातच सुबक साखळ्यांनी लपेटलेला
नंदी आहे. तिथे सुबक सुंदर त्रिमुखी, दोन कुंभ असणारे शिवलिंग.,अष्ट्पाक पिंडी तसेच
भिंतीवरही शिल्पपटावर सहस्त्र पिंडी आहेत.
येथेही विविध पिंडी आहेत अशी दंतकथा आहे कि येथुन व-हाड गायब झाल म्हणून याचे
नाव व-हाडघर या मुख्य लेणीतील पिंडीवर 1005 अयोनी शिवलींग आहेत.( जे शिवलिंग फ़क्त
शाळूंखीच असते) हेच ते सहस्त्रलिंग. पुर्वेच्या भिंतीवर पार्वतीची मुर्ती असुन 972
शिवलिंगे असुन ती देवीची 108 शक्तीपीठे व त्यांची 9 वेळा पुजा करण्याचा प्रघात दर्शवितात.
दक्षिणेकडील भिंतीवर शिल्पपटावर विष्णूची मुर्ती व पश्चिमेस सुर्याची मुर्ती या दोन्हीठिकाणी
1000 शिवलींग असुन ती विष्णुसहस्त्रनाम व सुर्यसहस्त्रनामाचे प्रतिक आहे. शिवाय येथे
शिवदंड तसेच काळसर्प असुन त्या शिल्पपटांवरही 1000 शिवलींग आहेत.या लेण्यात शिव तसेच
ब्रम्हाची मुर्ती आहे. येथे एक शिलालेख आहे, मात्र तो अस्पष्ट असल्याने वाचता येत नाही.शेजारील
लेण्यात विविध शिवलिंग खेचुन भरल्या सारखी असुन ती यातील बहुसंख्य शिवलींग अयोनिज तसेच
काही शिवलिंगावर शाळूंखा एवजी खड्डे आहेत.उजवी गुहा अंधकारमय असुन ती आत जाणारी आहे
तीत कमळ असणारे शिवलिंग तसेच अयोनिज लिंग धारण केलेली शिवलिंगे पहावयास मिळतात.
एकुणच हे नाथपंथीय लेणी असुन गोरक्षनाथ जेव्हा नाथपंथाच्या प्रसाराकरिता 32
शिराळा परिसरात आले, त्याकाळात याचीही उभारणी झाली असावी. येथील मुर्तीचीं रचना पाहता
108 वेळा जपाशी त्याचा संबंध आहे. अशाच प्रकारच्या मुर्ती कंबोडीयामध्ये आढळुन आल्या
असुन त्याही नाथपंथीय 1१-१२ व्या शतकातील आहेत. असा इतिहासाचा अनमोल ठेवा साता-यापासुन
अवघ्या 12 कि.मी अंतरावर आहे.






संदर्भ
·
अंतराळजाळावरील
माहिती (विकीपीडीया)
·
लेणी महाराष्टाची डा. दाऊद दळवी
मॅडम आपण भेट दिलेल्या ठिकाणचं तुमचं लिखाण वाचुन पुन्हा एकदा प्रत्यक्षात तेथे गेल्याचा आभास झाला. आपली लिखाण शैली अप्रतिम आहे.
ReplyDeleteKhup Chan
ReplyDeleteप्रत्यक्षात आपण भेट दिली आहे असे वाटते
ReplyDeleteGreat mrudula
ReplyDeleteNice blog...
ReplyDeleteMrudula...kupch chaan
ReplyDeleteपाटेश्वराचे अप्रतिम असे प्रवासवर्णन. भटकंती, प्रवासवर्णन हे माझे आवडते विषय. वाचून आनंद झाला, फिरायला गेल्याचा अनुभव आला.
ReplyDeleteआणि हो...! अन्य विषय जसे की राजकिय, व्यक्तिविशेष इत्यादी विषयही हाताळले तर वाचकांसाठी नक्कीच पर्वणी ठरेल. कृपया ब्लाॅग्सच्या संख्येत भर पाडावी. मृदगंध आसमंत बहरावा याच शुभेच्छांसह...🙏
Nice blog Mrudula
ReplyDeleteएकदम छान झालय लिखाण
ReplyDeleteVery nice blog dear Mrudula
ReplyDeleteखूप छान लिखाण मॅडम प्रत्यक्षात तिथे असल्याचा भास होत आहे....👌
ReplyDeleteKhup chaan lihal aahes..... Keep writing... 👍👌
ReplyDelete